37.9 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home महाराष्ट्र ‘कृषी मंत्री एक दिवस शेतावर’ उपक्रमाची सुरुवात

‘कृषी मंत्री एक दिवस शेतावर’ उपक्रमाची सुरुवात

0
62

गावात कृषी अधिकारीसहाय्यक येतात का ?कृषीमंत्र्यांनी केली विचारणा

मुंबईदि. 15 : शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी कृषी मंत्री एक दिवस शेतावर’ हा उपक्रम राबविण्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी 7 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी आठवडाभराच्या आतच कृषीमंत्र्यांनी केली असून आज त्यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडेअजंग-वडेलझोडगे आणि माळमाथा भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावात कृषी अधिकारीकृषी सहाय्यक येतात काअशी विचारणाही यावेळी कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केली.

शेतकऱ्यांना कृषी उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता एक दिवस शेतावर हा उपक्रम कृषीमंत्री श्री.भुसे यांनी सुरु केला असून कृषी सचिवआयुक्त यांनी 15 दिवसातून एकदा तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधावाअशा सूचना केल्या आहेत. या भेटीत पीक नियोजनउत्पादन क्षमता याबाबत चर्चा करतानाच उपलब्ध बाजारपेठ आणि विविध कृषी योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावीअसेही कृषीमंत्री भुसे यांनी विभागाला सूचना दिल्या आहेत.

नागपूर येथील शेतकरी पुरस्कार सोहळ्यामध्ये ही घोषणा करुन कृषीमंत्र्यांनी आजपासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरु केली. मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील शांताराम गवळी या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पीक विमा योजनाकांदा उत्पादन याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तुमच्या समस्या जाणून घेण्याकरिता कृषी सहाय्यककृषी अधिकारी तुमच्याकडे येतात काअशी विचारणाही कृषीमंत्र्यांनी यावेळी केली. श्री.भुसे यांनी  दिवसभरात अजंग-वडेलझोडगे व माळमाथा भागातील गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन संवाद साधला.