37.9 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home शैक्षणिक ओबीसी विभागातर्फे नवीन 16 शुल्काचे अनुदान मिळणार – विजय वडेट्टीवार

ओबीसी विभागातर्फे नवीन 16 शुल्काचे अनुदान मिळणार – विजय वडेट्टीवार

0
36

मुंबईदि.15 : विमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी आता 16 इतर शुल्कांचा समावेश केला असून त्याचे अनुदान अनुदानित व विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार असल्याची माहिती ओबीसी(बहुजन कल्याण) विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

श्री. वडेट्टीवार म्हणालेसन 2005-06 पासूनच्या कालावधीमध्ये महाविद्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे इतर शुल्कांच्या बाबींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपर्यंत हा लाभ फक्त अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये कलाविज्ञान आणि वाणिज्य या शाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अभ्यासक्रमांना विजाभज,  इमाव व  विमाप्र विद्यार्थ्यांना मिळत होता. परंतु सदरचा लाभ हा अनुदानित व विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक अभ्यासक्रमांना मिळत नव्हता.

            यामध्ये प्रवेश फीविविध गुणदर्शन उपक्रम शुल्क (Extra Curriculum/Activity fee), विद्यापीठ विकास निधीविद्यापीठ विद्यार्थी सहाय्य निधी/ कल्याण निधीप्रयोगशाळा शुल्ककॉलेज मॅगेजीन फीविद्यापीठ क्रीडा निधीविद्यापीठ विद्यार्थी विमा निधीग्रंथालय शुल्कसंगणक प्रशिक्षण फीविद्यापीठ अश्वमेध निधीयुथ फेस्टिवल शुल्कजिमखाना शुल्कनोंदणी शुल्कविद्यापीठ वैद्यकीय मदत निधीविद्यार्थी ओळखपत्र शुल्क अशा 16 शुल्कांचा समावेश करण्यात आला आहे.