38.1 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ “गण गण गणात बोते”च्या गजराने दुमदुमली गोंदिया नगरी

“गण गण गणात बोते”च्या गजराने दुमदुमली गोंदिया नगरी

0
40

गोंदिया,दि.19: प्रगटदिनोत्सव निमीत्ताने 14 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत श्री संत गजानन महाराज स्मारक संस्था गोंदिया तर्फे विविध कार्यक्रामांचे आयोजन करण्यात आले.प्रगटदिनोत्सव निमीत्त शुक्रवार दि. 14/02/2020 रोजी सकाळी 9.00 वा अभिषेक व आरती करुन सायंकाळी 5.00 वा गजानन महाराज मंदिर डब्लींग ग्राऊंड येथून भव्य “शोभायात्रा” काढण्यात आली. या वेळेस श्रींच्या मुखवट्यासह पालकी सोहळा मामा चौक, माता मंदिर चौक, इंगळे चौक, काका चौक या मार्गाने काढण्यात आला. या वेळेस अनेक भाविक शोभा यात्रेत सहभागी झाले असून ठिक-ठिकाणी महिलांनी श्रींची पुजा अर्चना करुन आशिर्वाद घेतला. संत श्री मुक्ताबाई भजन मंडळ छोटा गोंदिया व श्री हरिहर सोहम आनंद भजन मंडळ खमारी तर्फे श्रींच्या पालकी सोहळयात  ढोल,तासे, व भजन प्रस्तुती देण्यात आली तसेच शोभायात्रेत “गण गण गणात बोते” मंत्राचा जयघोष करण्यात आला.

शनिवार दि. 15 रोजी प्रगट दिनाच्या कार्यक्रमानिमीत्त सकाळी 9 वाजता अभिषेक, सत्यनारायण पुजा व आरती करण्यात आली. तसेच सायंकाळी वासंती दिलीप जोशी, पुणे यांनी सुश्राव्य किर्तनाचा प्रस्तुती दिली.  या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सोमवारला( दि. 17) दासनवमी निमीत्त श्रींचा अभिषेक व आरती करुन कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले असून समितीने सर्व भाविकांचे आभार मानले.