अर्जुनी/मोरगाव,दि.21ःजवळच्या येरंडी येथील रहिवासी मुन्नाभाई रेवचंद नंदागवळी हे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीमध्ये एम ए पदव्युत्तर अभ्यासक्रम आंबेडकर विचारधारा विषयात विद्यापीठातून प्रथम मेरीट असून त्यांना sgps टक्केवारी १० पैकी ९.६३ मिळाले आहे.दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ नामदेव कल्याणकर, प्रमुख अतिथी मानव विकास व विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचे अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर मुबंई, प्रभारी कुलगुरू डॉ चंद्रशेखर भूसारी, कुलसचिव डॉ ईश्वर मोहुर्ले तसेच व्यवस्थापन कक्ष, परिक्षा विभागाचे सर्व अधिकारी व प्राध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते.सदर गडचिरोलीच्या सातव्या दीक्षांत समारंभात मुन्नाभाई नंदागवळी यांना मेडल, गुणवत्ता प्रमाणपत्र, एम ए पदवी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.नंदागवळी विद्यापीठातून प्रथम मेरीट आल्यामूळे डॉ यशवंत मनोहर, बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव व आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख प्रा डॉ देवेश कांबळे, प्रा युवराज गंगाराम, प्रा डॉ सुरेश खोब्रागडे, संगम नंदागवळी, प्रा डॉ अनमोल शेंडे, प्रा डॉ जगदिश मेश्राम, आई-वडील व मित्र परिवारांनी अभिनंदन केले.
मुन्नाभाई नंदागवळी गोंडवाना विद्यापीठातून आंबेडकर विचारधारा विषयात प्रथम
सातवा दीक्षांत समारंभ : गडचिरोलीत सन्मानित





