सालेकसा,दि.21ः-महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त नगरपंचायत येथे प्रतिमेला माल्यार्पण करून शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातून प्रेरणा घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान तयार करून शासन कसे चालवावे व शासनाच्या जबाबदाऱ्या कसे पार पाडावे याचे धडे दिले. आज तरुणांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यायला हवी व तसे आचरणात आणायला हवे असे विचार नगराध्यक्ष वीरेंद्र उईके यांनी व्यक्त केले. ते छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरापर्यंत पोचल्यास समाजात होणाऱ्या गुन्हेगारीवर खूप मोठ्या प्रमाणात आळा घालता येईल त्यामुळे शिवाजी महाराज प्रत्येक जना मनात पोहोचविण्याचे कार्य करा, असेही ते बोलले.
कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून मुख्याधिकारी आशिष चौव्हान, बांधकाम सभापती उमेदलाल जैतवार,कर अधिकारी रवींद्र लिमये, लेखापाल संदीप लहाने, लिपिक कमलेश टेम्भूर्निकर,स्थापत्य अभियंता सतीश खजुरीया,अक्षय पटले,
लिपिक सिध्दार्थ कांबडे, गुलशन भलावी, संगणक चालक प्रकाश मानकर, व्हॉलमेन संतोष गभने, अनिल मरसकोळे व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश टेंभुर्णीकर यांनी केले तर मुख्य अधिकारी आशिष चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.





