33 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home विदर्भ रोहयो योजनेच्या कामांची मंत्री संदीपान भुमरे त्यांच्याहस्ते मार्कडादेव येथे विधीवत महापुजा संपन्न

रोहयो योजनेच्या कामांची मंत्री संदीपान भुमरे त्यांच्याहस्ते मार्कडादेव येथे विधीवत महापुजा संपन्न

0
49

गडचिरोली,दि.21:- राज्याचे रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी गडचिरोली मधील विविध रोहयो कामांची पाहणी करून सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच त्यांनी यावेळी रोजगार हमी योजनेतील कामांची संख्या वाढवून स्थानिकांना आवश्यक रोजगार उपलब्ध करून देणेसाठी सूचना केल्या. जिल्हयातील मार्कंडादेव येथील महापुजेचे आयोजन त्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पहाटे 4 वाजता श्री शंकर महादेवाच्या शिवलींग पिडींची विधीवत पुजा करण्यात आली. यावेळी आमदार डॉ.देवराव होळी, मार्कंडादेवस्थान कमिटीचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

त्यांनी यावेळी रोजगार हमी बाबत तळोधी मो. या गावाला भेट दिली. जॉब कार्ड, कामांची संख्या व गुणवत्तेबाबत त्यांनी यावेळी पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. लोकांकडून यावेळी अंमलबजावणी मधील अडथळे समजावून घेतले. यावेळी ते म्हणाले पाणंद रस्ते बाबत लवकरच कामे पुर्ण होतील. यानंर त्यांनी कृषी विभागाच्या वाकडी गडचिरोली येथील तालुका फळ रोपवाटीकेला भेट दिली. यावेळी अनंत पोटे, प्रिती हिरळकर व तालुका कृषी अधिकारी ठाकरे उपस्थित होते. वन विभागाकडून सुरू असलेल्या सोनापून येथील रोपवाटीकेचीही पाहणी संदिपान भूमरे यांनी केली. साग, खैर, बांबू, आवळा अशा वेगवेगळया जातीबाबत त्यांनी माहिती घेतली.