29.4 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home गुन्हेवार्ता मोबाईल चोर रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात

मोबाईल चोर रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात

0
34

गोंदिया,दि.22 : हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर येताच जनरल बोगीमध्ये प्रवाश्यांचा गदीर्चा फायदा घेत त्यांच्या सामानांवर नजर ठेवून असलेल्या संशयीत आरोपीला रेल्वे सुरक्षा दल व टास्क टीमने पकडले. तसेच त्याच्याकडून ९ हजार ४00 रुपए किंमतीचा मोबाईल जप्त केला. ही १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली. तस्वीर अहमद मतीउल्लाह (२८) रा. कुडवा जि. प्रयागराज, उ.प्र. असे त्या आरोपी चोराचे नाव आहे.
दपूम नागपूर रेल्वे सुरक्षा दलाचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे, सहायक सुरक्षा आयुक्त ए. के. स्वामी यांच्या मार्गदर्शनात टास्क टीमचे उपनिरीक्षक विनेक मेर्शाम, मुख्य आरक्षक पी. दलाई, आर. के. रेखवार, आरक्षक नासीर खान हे रेल्वे स्थानकात गुप्त नजर ठेवून होते. दरम्यान, फलाट क्रमांक 3 वर हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस येताच तेथील जनरल बोगीमध्ये प्रवाश्यांचा सामानावर नजर ठेवून असलेल्या युवक आढळला. चौकशीसाठी त्याला बोलावल्यावर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, टास्क टीमने त्याला पकडले. चौकशी केल्यावर त्याने आपले नाव तसबीर अहमद मतीउल्लाह रा. कुंडवा जि. प्रयागराज, उत्तरप्रदेश असे सांगितले. तसेच त्याच्याजवळ असलेल्या मोबाईलचा लॉक उघडण्यास सांगितल्यावर तो उघडू शकला नाही. तसेच त्याने सदर मोबाईल प्रवाश्यांचा गदीर्चा फायदा घेवून चोरी केल्याची कबुली दिली. रेल्वे पोलिसांनी सदर मोबाईल चोरीच्या असल्याची पुष्टी करून गुन्हाची नोंद केली.