गोंदिया दि.22:: नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड युनिट महाराष्ट्रा संचालित नॅब क्रियाकल्प सेंटरचे उदघाटन रविवार २३ फेबु्रवारी रोजी सकाळी १० वाजता टी़ बी़ टोली गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेला आहे़ यावेळी सेंटरचे उदघाअन गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांच्या हस्ते होणार आहे़. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ़ कादंबरी बलकवडे, माजी आमदार राजेंद्र जैन, मुकाअ डॉ़ राजा दयानिधी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ व्ही़ पी़ रुखमोडे, अपूर्व मेठी, मनोज राऊ त, रामेश्वर राऊत, सूर्यभान साळुंखे, भावेश भाटिया, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार उपस्थित राहणार आहेत़ कार्यक्रमानिमित्त बुध्दिस्ट समाज संघाच्या वतीने भोजनदानाचे कार्यक्रम आयोजित केले आहे़. कार्यक्रमासाठी प्रा़ शशिकांत चवरे, निरुषा चवरे, प्रा़ सविता बेदरकर, तोलाराम मानकानी आदि सहकार्य करणार आहेत़.




