38.1 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home रोजगार/व्यापार जनगणनाकरिता कंत्राटी पदभरतीच्या २५ फेब्रुवारी रोजीच्या मुलाखती रद्द

जनगणनाकरिता कंत्राटी पदभरतीच्या २५ फेब्रुवारी रोजीच्या मुलाखती रद्द

0
60

वाशिम, दि. २3 : जनगणना २०२१ करिता तांत्रिक सहाय्यक, बहुकार्य कर्मचारी (एमटीएस स्टाफ) या पदांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा जनगणना अधिकारी यांच्यामार्फत १५ फेब्रुवारी २०२० रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र सामान्य प्रशासन विभागाच्या १७ फेब्रुवारी २०२० रोजीच्या पत्रानुसार सदर जाहिरात कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करून त्याद्वारे जनगणना २०२१ करिता तांत्रिक सहाय्यक व बहुकार्य कर्मचारी (एमटीएस स्टाफ) या पदांकरिता पात्र उमेदवारांची निवड करण्याचे निर्देश पात्र झाले आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे समक्ष अथवा पोस्टाने अर्ज दाखल केले आहेत त्यांच्या २५ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत.

कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत पात्र व पुरेसे उमेदवार मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार पात्र उमेदवार मिळण्यासाठी मुलाखत घेण्याची आवश्यकता भासणार नाही. मात्र कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत पुरेसे पात्र उमेदवार मिळाले नाहीत, तर ज्या उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात समक्ष अथवा पोस्टाने विहित मुदतीत अर्ज सादर केले आहेत, त्यांच्या मुलाखती घेण्याची भासल्यास त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://washim.nic.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे सूचना देण्यात येईल, असे जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी कळविले आहे.