गोंदिया दि. २3 :: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह गोंदिया येथील विद्यार्थ्यांकरीता 15 फेब्रुवारीला व्यक्तीमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाईफ व्हिजन अँड डायरेक्शन या संस्थेचे सागर कुंभरे व श्रीमती सुरेखा बघेले यांनी चांगल्या सवयीमुळे विद्यार्थ्यांना प्रभावी व्यक्तीमत्व घडवता येवू शकते तसेच व्यक्तीमत्व विकासाकरीता आवश्यक गोष्टीचे सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास गृहपाल जे.एम.कर्णाळे व एच.एस.घाटघुमर उपस्थित होते.




