37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News भारतामध्ये पाकने नापाक कृत्ये करूनयेत – राजनाथ सिंह

भारतामध्ये पाकने नापाक कृत्ये करूनयेत – राजनाथ सिंह

0
22

जम्मु, दि. २७ – पाकिस्तानने भारताबाबात नापाक विचार करू नयेत.पाकिस्तानला जर स्वतःचे भविष्य घडवायचे असेल तर त्यांनी इतर देश व भारतात नापाक कृत्ये करणे थांबवावे, असा सज्जड दम राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे. ते जन कल्याण पर्व या कार्यक्रमात बोलत होते. भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणा-यांना आमचे लष्कर योग्य प्रत्य्यूत्तर देईल. आमचा आमच्या लष्करावर, नीम लष्करावर पूर्ण विश्वास आहे.
आम्ही सर्व देशांसोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याच्या नेहमीच प्रयत्नात असतो. पाकिस्तान सोबत चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही अनेक प्रयत्न केले. तसेच, पंतप्रधान मोदींनी शपथविधी सोहळ्याकरता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनाही बोलवले होते. परंतू, पाकने वेळोवेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. असेही सिंह यांनी म्हटले आहे.

blank