34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ कोडेलोहाराच्या सिमेंट बंधार्‍याचे भूमिपूजन

कोडेलोहाराच्या सिमेंट बंधार्‍याचे भूमिपूजन

0
34

blank

तिरोडा,दि.२८- तालुका कृषी विभागांतर्गत कोडेलोहारा येथे जलयुक्त शिवार अभियान २0१५-१६ अंतर्गत सिमेंट बंधारा एम.आय. पॅटर्नचे भूमिपूजन गोरेगाव-तिरोडा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आला. अतिथी म्हणून तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, सरपंच देविका उईके, सिध्दार्थ खोब्रागडे, प्यारेलाल पटले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन तालुका कृषी अधिकारी पी.व्ही.पोटदुखे यांनी केले होते. कार्यक्रमाला कृषी विभागाचे मुंडीकोटा क्षेत्राचे मंडळ कृषी अधिकारी बोरकर, तिरोड्याचे मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले, कृषी पर्यवेक्षक किंदर्ले, कुकडे, डोंगरवार, शिंदे, रिनाईत उपस्थित होते

blank