34.8 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ पवार सांस्कृतिक भवन येथे महिलादिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

पवार सांस्कृतिक भवन येथे महिलादिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

0
105

blank

गोंदिया,दि.07 : पोवार प्रगतीशील मंच अंतर्गत पवार महिला समिती गोंदियाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कन्हारटोली येथील पवार सांस्कृतिक भवन येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमीत्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेच्या महासचिव पुष्पा बिसेन राहणार आहे. तर कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा महिला समितीच्या अध्यक्षा देविका कटरे यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून मौसम हरिणखेडे, गीता खिलेंद्र हरिणखेडे, चेतना रविकांत बोपचे व गोंदिया बस आगार प्रमुख संजना पटले उपस्थित राहणार आहेत. यावेळी अतिथींचे स्वागत तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला समाजाच्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पवार महिला समिती गोंदियाचे वतीने संयोजिका रश्मी रहांगडाले यांच्यासह समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.