34.8 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home गुन्हेवार्ता रेल्वे तिकीट दलालास अटक

रेल्वे तिकीट दलालास अटक

0
124

लाखनी,दि.07ःअवैध तिकीट विक्री करणार्‍या तिकीट दलालाची धरपकड मोहीम सुरू आहे. गुप्त माहितीच्या आधारे लाखनी तालुक्यातील लाखोरी येथे धाड टाकण्यात आली. यात रेल्वे तिकीटाची अवैध ऑनलाईन विक्री करताना चेतन गिर्‍हेपुंजे याला अटक करण्यात आली. यात १३ हजार ३११ रुपयाचे ऑनलाईन तिकिटसह ५0 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. रेल्वे अधिनियम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंडळ रेल्वे सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे व सहाय्यक आयुक्त ए. के. स्वामी यांच्या धडक कारवाई मोहिमअंतर्गत पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वात रेल्वे तिकीट दलालांवर धडक कारवाई मोहीम सुरू आहे. लाखनी तालुक्यात लाखोरी येथे ऑनलाईन तिकीट दलाली जोमात असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे धाड टाकण्यात आली. यात तिकीट दलाल चेतन गिर्‍हेपुंजे ऑनलाईन अवैध तिकीट विक्री करीत असल्याचे उघडकीस आले. बनावट इ-मेल पत्त्याचा वापर करून ९ जुन्या तिकीट विक्री केल्याचे तपासणीत आढळून आले.
अवैध रेल्वे तिकीट विक्री करण्याच्या आरोपावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळ १३ हजार ३११ रुपयाचे रेल्वे प्रवास तिकीट व यासाठी वापरण्यात येणारे कॉम्पुटर मॉनिटर, सीपीयू, मोबाईल, प्रिंटर असे अंदाजे ५0 हजार रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आले. धडक मोहीम कारवाईत रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक जय सिंग आरक्षक भुपेश देशमुख, कृष्णा सावरकर उपस्थित होते.