40.6 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ झरपडा येथे वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी

झरपडा येथे वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी

0
178

blank

अर्जनी मोरगाव,दि.07ः-तालुक्यातील झरपडा येथे दोन वर्षापासून 5 मार्चला वीर एकलव्या जयंती उत्साहात साजरी केली जाते.कार्यक्रमाच्या सुरवातीला गावतील प्रथम नागरिक सरपंचा यांच्या हस्ते वीर एकलव्य पुतळ्याचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. जयंतीच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून तमुस समिती द्वारा झरपडा येथील सुरज होमरज मेश्राम व जमुनताई खेमराज नागपुरे या दोन प्रेमी युगलाचा विवाह लावून देण्यात आला.प्रमुख मार्गदर्शक घनश्याम परशुरामकर यानी उपस्थीत गावकर्याना वीर एकलव्या हे कोन होते त्यांची जयंती साजरी करण्यामागचा ऊद्देश कय असायला पाहिजे ,ज्या प्रमाणे आपल्या तरुण वयात आपला आंगठा गमावून बसुन सुद्धा त्याने जी क्रांती केली तिच क्रांती करने आजच्या तरुणाने गरजेचे आहे. तेव्हाच आपला ढ़ीवर समाज हा पुढे जाईल त्याचबरोबर शिक्षण हे सुद्धा महत्वाचे हत्यार असल्याचे प्रतिपादन त्यानी केले.
सायकांळला हभप प्रशांत ठाकरे महाराज यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी उमाकांत ढेंगे, सरपंचा कुंदा डोंगरवार,होमरज ठाकरे,गजानन डोंगरवार,भैया मेश्राम,उपसरपंच विश्वनाथ खोब्रगड़े,राष्ट्र्पल रामटेके ,रवी मस्के,गोविंदा मस्के,संतोष डोंगरवार,मुन्ना बोरकर,उपस्तिथ होते.संचालन व आभार हेमंत मेश्राम यानी मानले.
कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी आनंदराव सोनवणे,अमर्चंद कांबळे,रवी कांबळे,व्यंकट मखरे,मंगेश मखरे,राकेश मखरे,तसेच सर्व ढ़ीवर समाज संघटनेने सहकार्य केले.