गोरेगाव,दि.08- तालुक्यातील ढिमरटोली-डव्वा मार्गावरील LHS No. 6 रेल्वे पुलाच्या सदोष पणामुळे थोड्याशा पाण्यात परिसरातील अनेक गावातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. मात्र रेल्वे प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे तालुका महिला आघाडी अध्यक्षा चित्रकला चौधरी यांनी जागतिक महिला दिनी धरणा आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर त्यांच्या आंदोलनाची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली असून 8 मार्च रोजी प्रशासनाकडून रेल्वे पुलाखालून पाणी निकासी व नाली गाळ निकासी कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ढिमरटोली-डव्वा मार्गावर काही वर्षा आधी भूमिगत पूल बांधकाम करण्यात आले. मात्र पुलाचे बांधकाम सदोष असल्याने या नाल्यातून पाणी निकासी योग्य रित्या होत नसल्याने या ठिकाणी पाणी साचून राहत आहे. गोरेगाव या ठिकाणी येण्यासाठी याचा त्रास या भागांतील डव्वा, कवलेवाडा, शहारवाणी, धानुटोला, ईसाटोला, रापेवाडा, चुटिया, चीचटोलासह ईतर गावातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. अल्पशा पाण्यामुळे या ठिकाणी पाणी साचून राहिल्याने विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी त्रासाचे होत होते. याआधीही अनेकदा निवेदन देण्यात येऊनही काम समाधानकारक झाले नव्हते. मागील आठवड्यात ही निवेदन देऊन मागण्या सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. मात्र त्याचा काहीही फायदा न झाल्याने रेल्वे प्रशासनान विरोधात आंदोलनात्मक पावित्रा घेण्याचा निर्णय भाजप तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रकला चौधरी यांनी घेतला. 8 मार्च जागतिक महिला दिनी त्यांनी धरणा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या आंदोलनाची रेल्वे प्रशासनाने 7 मार्च रोजी दखल घेत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. 8 मार्च रोजी सकाळी 10 वाजता रेल्वे प्रशासनाने पुलाखालून जेसीबी च्या माध्यमातून पाणी निकासी तसेच पूरक नाली बांधकाम व नाली उपसा करण्याचे काम सुरू केले आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर काम सुरू होते की नाही, यासाठी आज सकाळी 10 वाजता डव्वा सह ईतर गावातील नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी भाजप तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रकला चौधरी, कल्पना टेंभरे, योगेश चौधरी, उपसरपंच डॉ. पेमेंद्र कटरे, लोकचंद टेंभरे, किशोर कटरे, दीपक तूरकर आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे जर रेल्वे प्रशासनाने थातूरमातूर काम उरकून जनतेचे डोळे पुसण्याचे काम केले तर पुन्हा यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चित्रकला चौधरी यांनी दिला आहे.
अखेर महिला दिनी रेल्वे प्रशासनाने घेतली महिला आंदोलनाची दखल!
ढिमरटोली-डव्वा रेल्वे पूल प्रकरण तालुका महिला आघाडी चित्रकला चौधरी यांनी दिला होता धरणा आंदोलनाचा इशारा





