33 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home विदर्भ लघु उद्योगांतून महिलांनी स्वावलंबी व्हावे-मनिषा तरोेणे

लघु उद्योगांतून महिलांनी स्वावलंबी व्हावे-मनिषा तरोेणे

0
62

नवेगावबांध,दि.09: महिलांनी गृह उद्योग, लघु उद्योग करुन आर्थिक दृष्ट्या संपन्न व्हावे. ज्या महिला पुढे होऊन काम करायला तयार आहेत. अशा महिलांना qकवा गटांना आपण व्यक्तीथश मदत करण्यास तयार आहोत असे प्रतिपादन अ‍ॅग्री qकग शेतकरी उत्पादन कंपनीच्या संचालक मनिषा तरोणे यांनी केले. त्या येथील संविधान ग्रामसंघ, सत्यम ग्रामसंघ, जिजाऊ ग्रामसंघ तसेच नवेगावबांध ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी येथील ग्रामपंचायत परिसरात विविध कार्यक्रम व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी जनजागृती शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत तिन्ही ग्रा संघाच्या ७५ महिला बचत गटाच्या महिलांनी सहभागी होत्या. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य विजयाताई कापगते होत्या. कार्यक्रमाला पं.स.सभापती अरqवद शिवणकर, शारदा नाकाडे, भारती कापगते, डॉ. लता लांजेवार, रचना गहाणे, जातुबाई कापगते, विशाखा साखरे, वैशाली बोरकर, सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, हेमलता गुप्ता, भिमाबाई शहारे, शालू गोंधळे, मैथिली चौकसे, निलम अग्नीहोत्री, ज्योती उईके, शीला सांगोळकर, मांढरे आदि उपस्थित होते. यावेळी सांस्कृतीक कार्यक्रम पार पडले. प्रास्ताविक सत्यम महिला संघाच्या अध्यक्ष मैथीली चौकसे यांनी मांडले. संचालन रुपाली चाचेरे यांनी केले. आभार प्रिती खंडाईत यांनी मानले.