30.6 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ शेतकऱ्यांनो उत्पादन सोबत उत्पन्न सुद्धा वाढवा – आ.विनोद अग्रवाल

शेतकऱ्यांनो उत्पादन सोबत उत्पन्न सुद्धा वाढवा – आ.विनोद अग्रवाल

0
98
गोंदिया,दि.09ः- भारत हा कृषिप्रधान व तरुणांचा देश असून संपूर्ण देशाची उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे. त्यात मधल्या काळात तरुणांनी शेतीकडे दुर्लक्ष केल्याने शेतीत भरपूर मोठ्या प्रमाणात तूट निर्माण झाली.मात्र आज शासनाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना कृषी आणि पशुसंवर्धन विभागाद्वारे पुरवल्या जात आहेत. ज्यातून शेतकरी आपले उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवित असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी आता उत्पादन वाढीसोबतच उत्पन्न वाढीकडे सुद्धा गांभीर्याने बघणे गरजेचे असल्याचे विचार आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले.
ते जिल्हा परिषद शाळा नंगपुरा मूर्री येथे आयोजित कृषी व पशुपक्षी प्रदर्शनी तथा शेतकरी व पशुपालक मेळाव्यात उद्घाटक म्हणून बोलत होते. पुढे बोलताना शेतकऱ्यांनी शेती आणि पशुपालन व्यवसायातून समृद्धीकडे वाटचाल करता येते व त्यासाठी शास्त्रीय, तंत्रशुद्ध, शाश्वत आणि जैविक शेती करण्याची गरज असून त्याला विविध शासकीय योजनांचा साथ लाभल्यावर ते सहज शक्य होईल.शेतकऱ्यांनी नोकरीकडे न बघता शेतीतूनच वैभव आणि समृद्धीकडे वाटचाल करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमाताई मडावी होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी व पशुसंवर्धन सभापती  शैलजाताई सोनवाने, महिला व बालकल्याण सभापती लताताई दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरीताई हरिणखेडे, छत्रपाल तुरकर, भाऊराव उके, मुनेश रहांगडाले,  मूर्री येथील सरपंच ओमप्रकाशजी रहांगडाले, पिंडकेपार सरपंच सुधीर चंद्रिकापुरे, जिल्हा कृषी अधिकारी गणेश घोरपडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजेश वासनिक, कृषी विकास अधिकारी मनोहर मुंडे, पंचायत समिती सदस्य दीपाताई चंद्रिकापुरे व रामराजभाऊ खरे इत्यादी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच नंगपुरा मूर्री येथील ग्रामपंचायत सदस्य ब्रह्मानंद शहारे, मीना टालटे, संदीप टेम्भेकर, सुनंदा जांभूळकर, राजेश टेकाम, मीना सूर्यवंशी, तीर्थराज रहांगडाले, पूजा बिजेवार, रामेश्वरी बोपचे, पुष्पा शरणागत सुद्धा मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक गटविकास अधिकारी जावेद इनामदार, पशुधन विकास अधिकारी डॉ. विशाल आडे, सहाय्यक गटविकास अधिकारी दिलीप खोटेले, कृषी अधिकारी अनुप शुक्ला, कृषी अधिकारी जि. एस. रहांगडाले, विलास राठोड, आर. के. कटरे, पशुधन पर्यवेक्षक संजय सव्वालाखे व ग्रामसेवक योगराज बिसेन इत्यादी मंडळींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.