गोंदिया,दि.10-गोंदिया शहरातील सगळे वाहतुक सिग्नल गेल्या एक वर्षापासुन बंद आहेत. त्यामुळे मुख्य मार्गावरील वाहतुक व्यवस्थेचे तिनतेरा वाजले असून शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शहराच्या मुख्य मार्गांवर वाहतुक सिग्नल लावण्यात आले होते.सिग्नल दुरूस्तीचे काम नगर परिषदेने न केल्याने गेल्या एक वर्षापासुन जयस्तंभ चौक, नेहरू चौक, शक्ती चौक या मुख्य मार्गावरील वाहतुक सिग्नल बंद पडले आहेत. जयस्तंभ चौक हा शहरातील महत्वाचा चौक असून येथून 4 भागात जाणारे रस्ते आहेत.त्यातच प्रशासकीय इमारत,पंचायत समिती कार्यालय,न्यायालय,एलआयसी कार्यालय असे कार्यालय या चौकाशेजारीच असल्याने नेहमीच वाहतुकीची कोंडी होते.त्यातच गेल्या तीन चार दिवसापासून वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षकांनी निवडक पोलिसांची या चौकात ड्युटी लावून एकेरी वाहतुक सुरु केली आहे.मात्र हे करतांना वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असून लांबपर्यंत रागंच रांगा लागतात.उजव्या बाजुला जाणार्या वाहनांना थांबवितांना डाव्याबाजुच्या वळणरस्त्याकडे जाणारी वाहनेही थांबवली जाऊ लागल्याने वाहतुक पोलिसांनाच वाहतुकीचे नियम आठवत नाही का असा प्रश्न वाहनचालक चिडून विचारु लागले आहे.याप्रकारामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे.तर चौकातच आॅटोचालक,रिक्षाचालकांनी अतिक्रमण करुन वाहने थांबविल्याने तसेच प्रशासकीयइमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारीच वाहन थांबत असून त्याठिकाणी असलेल्या काही दुकांनामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा होऊ लागला आहे.वाहतुक पोलिसांनी वाहतुक सुरळीत करण्याअगोदर चौकातील चारही बाजुचे अतिक्रमण तसेच रस्त्यावरील आॅटो,रिक्षासारखी इतर वाहने जे 100 मिटरपर्यंत लागून आहेत हटविण्याची गरज होती,परंतु तसे न केल्याने वाहतुकीची कोडी होऊ लागल्याने वाहतुक शाखेच्या या भूमिकेवरच नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत वाहतुक शाखेलाचा वाहतुक नियमांचा विसर मात्र वसुलीची आठवण असा सुरु काढणे सुरु केले आहे.
गोंदिया शहरातील मुख्यचौक जयस्तंभ चौक.याठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून वाहतुक सिग्नल लावण्यात आलेत.परंतु ते गेल्या एकदीड वर्षापासून बंद पडल्याने वाहनचालक बिनधास्त वाहन चालवायाचे.यावर काही नागरिकांनी वाहतुक शाखेकडे तक्रार केली.त्या तक्रारीनंतर गेल्या तीन चार दिवसापासून वाहतुक पोलीसांना उभे करुन वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.मात्र वाहतुक सुरळीत करतांना डाव्या बाजूची जागा डाव्या बाजुला जाणार्या वाहनासांठी मोकळी न ठेवता बिनधास्त संपुर्ण रस्ता बंद करुन वाहतुक थांबवली जात आहे.विशेष करुन याच चौकात मुख्य प्रशासकीय इमारत असून त्या इमारतीच्या शेजारीच चहापानटपरीवरील लोकांची गर्दी आणि त्यानंतर ही वाहतुक थांबल्याने चारही बाजुनी चांगलीच कोंडी होताना दिसून येत आहे.
वाहतुक शाखेचे वसुलीकडे लक्ष,मात्र वाहतुक नियमांचाच विसर
गोंदियातील सिग्नल बंद, वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा




