गोंदिया,दि.11ः- शिवसेनेच्यावतीने छत्रपति शिवाजी महाराजांची ३९०वीं जयंती १२ मार्च रोजी महाराष्ट्रात साजरी करण्यात येत असून गोंदिया जिल्हा शिवसेनेच्यावतीने जयंतीनिमित्त ३९० विविध प्रकाराच्या वृक्षांचे रोपटे भेट देत ही जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे यांनी दिली आहे.पर्यावरण व स्वच्छतेला महत्व देत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रोपटे वितरीत करण्यात येणार असल्याचे शिवहरे यांनी म्हटले आहे.अभियानाच्या सुरवातीला छत्रपति शिवाजी महाराजाच्या प्रतिमेला जलाभिषेक करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात येणार आहे.यावेळी भंडारा-गोंदिया के संपर्क प्रमुख नीलेश धुमाल, उपजिला प्रमुख तेजराम मोरघडे, जिला समन्वयक पंकज यादव, जिला संघटक सुनील लांजेवार, ता. प्रमुख टोकेश हरिनखेड़े, तिरोडा तालुका प्रमुख अरुण हिरापुरे, विधानसभा संघटक दिल्लू गुप्ता, युवा सेना तालुका अधिकारी पिंटू कटरे, शहर प्रमुख गुड्डु ऊके, युवा सेना शहर अधिकारी आशु मक्कड़, महिला आघाड़ी मोहिता मक्कड़,विभाग प्रमुख,तालुका उपप्रमुख,शहर उपप्रमुख आदी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित राहणार आहेत.





