33.1 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करावे

कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करावे

जिल्हयात 25250 लाभार्थी पात्र 17642 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण

0
95
BerarTimes

भडारा दि.11 : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत, विविध सेवा सहारी संस्था व बँकामध्ये लावण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांनी आपले सेवा क्रेंद्र तसेच बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणिकरण करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

महाराष्ट्र शासनाने राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहिर केलेली आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत भंडारा जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांकडील 01 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30 सप्टेंबर 2019 रोजी मुघल व व्याजासह थकीत असलेली च परतफेड न झालेली रक्कम रुपये 2 लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांचे अल्प-अत्यल्प भुधारक याप्रमाणे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्ज खात्यात रुपये 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे.

त्यानुषंगाने जिल्हयातील सर्व राष्ट्रियकृत बँकेने त्यांचे कडील 10110 पात्र खात्यांची व भंडारा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्या. भंडारा बँकेतील 25215 पात्र खात्यांची माहिती 1 ते 28 टेम्प्लेट मध्ये भरुन शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे.

यापैकी शासनाने प्रायोगिक तत्वावर जिल्हयातील भंडारा तालुक्यातील शहापूर व सिल्ली या दोन गावांमधील राष्ट्रियकृत बैंक, ग्रामिण बैंक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 240 शेतकऱ्यांची यादी 24 फेब्रुवार 2020 रोजी प्रसिध्द केलेली आहे. तसेच 29 फेब्रुवारी 2020 रोजी 25010 इतक्या शेतकऱ्यांची असे एकुण 25250 शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द केलेली आहे. सदरहु यादी संबंधित गावांमधील आपले सेवा केंद्र, सी.एस.सी. केंद्र, चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे कार्यालय तसेच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिध्द केलेली आहे. परंतु यादीतील 25250 शेतकऱ्यांपैकी 17642 इतक्या शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण केलेले आहे. आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात कार्यवाही सुरु आहे.

सबब ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आधार प्रमाणीकरण केलेले नाही अशा पात्र शेतकऱ्यांनी  आधार प्रमाणीकरण संबंधाने आपले सेवा केंद्र, सी.एस.सी. केंद्र तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेच्या आधार प्रमाणिकरण केंद्रावर आपले विशिष्ट क्रमांक, बैंक पासबुक व आधार कार्ड घेवून आधार प्रमाणिकरण करुन ध्यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात येत आहे.