गोंदिया दि.12: जागतिक महिला दिनानिमीत्त महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त वतीने 8 मार्च जागतिक माहिला दिनानिमीत्त नवीन प्रशासकीय इमारत येथे तेजस्विनी सन्मान-2020 महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, झाडीपट्टीच्या बहिणाबाई अंजनाबाई खुणे, डॉ.वर्षा गंगणे, उषा आत्राम, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुवर्णा हुबेकर, आत्मा विभागाचे वैभव मुंगळे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, जिल्हा संरक्षण अधिकारी रुपाली मेश्राम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.अग्रवाल म्हणाले, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणाकरीता विविध योजना राबविण्यात येत आहेत. आज महिला विविध क्षेत्रात अग्रेसर होतांना दिसत आहेत. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री होण्याकरीता जिल्हास्तराव विक्री केंद्र उभारण्याकरीता शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
अंजनाबाई खुणे यांनी निर्भया कवितेच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराबाबत विस्तृत माहिती दिली. जिल्हा संरक्षण अधिकारी रुपाली सोयाम यांनी महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचार थांबविण्याकरीता कौटूंबिक हिंसाचार कायदा 2005 नुसार कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीचा वापर अन्यायग्रस्त व पिडीत महिलांनी करुन घेतला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे व नगरपरिषदेचे क्षमता बांधणी व्यवस्थापक यांचेही यावेळी समयोचित मार्गदर्शन झाले.महिला सक्षमीकरण कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल झाडीपट्टीच्या बहिणाबाई अंजनाबाई खुणे, डॉ.वर्षा गंगणे, उषाताई आत्राम यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षांचा व शहरस्तरीय संघाच्या अध्यक्षांचा तेजस्विनी सन्मान-2020 चे सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. यामध्ये तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र तिरोडा- शकुंतला बारापात्रे, नारीचेतना लोकसंचालित साधन केंद्र देवरी- साजिदा बेगम वाजीद अली सिद्दिकी, तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र गोरेगाव- नलिनी डोंगरे, उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्र गोंदिया- तुलसी चौधरी, आधार लोकसंचालित साधन केंद्र सडक/अर्जुनी- नंदा ठाकरे, स्वावलंबन लोकसंचालित साधन केंद्र आमगाव- शांता चंद्रिकापुरे, सहारा लोकसंचालित साधन केंद्र सालेकसा- अर्चना चुटे, संघटन लोकसंचालित साधन केंद्र वडेगाव- वंदना कावळे, साक्षात लोकसंचालित साधन केंद्र मुंडीकोटा- वनिता भांडारकर, स्त्री शक्ती लोकसंचालित साधन केंद्र करटी/बुज.- शबनम शेख, तेजप्रवाह लोकसंचालित साधन केंद्र सुकळी- आशा बिसेन, प्रयास लोकसंचालित साधन केंद्र परसवाडा- रामकला पटले, ग्रामउन्नती लोकसंचालित साधन केंद्र सरांडी- जयतुरा उके, सखी लोकसंचालित साधन केंद्र साखरीटोला- विद्या पारधी, स्त्री गौरव लोकसंचालित साधन केंद्र कावराबांध- निशा बैठवार, जयसेवा लोकसंचालित साधन केंद्र पिपरीया- वंदना उईके, तेजस्वी शहरस्तरीय संघ गोंदिया- सरला क्षीरसागर, वटवृक्ष शहरस्तरीय संघ गोंदिया-किरणताई फुले, विकास शहरस्तरीय संघ तिरोडा- मंदाकीनी गाढवे यांना मान्यवरांच्या हस्ते ‘तेजस्विनी सन्मान-2020’ सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
आत्मा विभागामार्फत उपजिविका क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल स्वावलंबन लोकसंचालित साधन केंद्र आमगावच्या अध्यक्षा शांता चंद्रिकापुरे व सीएमआरसी व्यवस्थापक आशा दखणे यांना मान्यवरांच्या हस्ते 20 हजार रुपयांचा पुरस्कार व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.याप्रसंगी दिनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, बेटी बचाव बेटी पढाव जनजागृतीकरीता स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. यावेळी डॉ.वर्षा गंगणे यांच्या स्वयंलेखीत ‘स्त्री विकास व अनुत्तरीत प्रश्न’ पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले. संचालन शालू साखरे व प्रदिप कुकडकर यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा संरक्षण अधिकारी रुपाली सोयाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, योगेश वैरागडे, राम सोनवणे, हेमंत मेश्राम, प्रफुल अवघड, एकांत वरघने, तृप्ती चावरे, मोनिता चौधरी, कुंजलता भुरकूडे, सुचिता आवारी तसेच उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या सहयोगिनी व जिल्ह्यातील सर्व समुपदेशक, तालुक्यातील संरक्षण अधिकारी यांनी सहकार्य केले.
00000





