39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ पाणी टंचाई उपाययोजना 12 नविन विंधन विहिरींना मान्यता

पाणी टंचाई उपाययोजना 12 नविन विंधन विहिरींना मान्यता

0
100

 गोंदिया दि.12::  जिल्हाधिकारी गोंदिया यांनी टंचाई निवारणाच्या कामासाठी असलेल्या अधिकाराचा वापर करुन आमगाव तालुक्यातील 7 गावे/वाड्यामध्ये व गोंदिया तालुक्यातील 5 गावे/वाड्यामध्ये, अशा एकूण 12 नविन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

आमगाव तालुक्यातील वाघाटोला येथे श्री बरई यांच्या शेताजवळ, वाघडोंगरी येथे हेमराज रहांगडाले यांच्या घराजवळ, येरमडा येथे अनिल सोनवाने यांच्या घराजवळ, जैतुरटोला येथे भैय्यालाल रहांगडाले यांच्या घराजवळ, बघेडा येथे छन्नू टेकाम यांच्या शाळेजवळ, बघेडा (भवानीटोला) येथे जिल्हा परिषद शाळेजवळ, माडीटोला येथे गोविंदराव टेकाम यांच्या शेताजवळ. गोंदिया तालुक्यातील कुडवा येथे सतू कडनाईके यांच्या घराजवळ, नंगपूरा मुर्री येथे मिराबाई बागडे यांच्या घराजवळ, पिंडकेपार येथे मधू कुर्वे यांच्या घराजवळ, लोधीटोला (घिवारी) येथे गांधी विद्यालयाजवळ, लोधीटोला (सावरी) येथे पाण्याच्या टाकीजवळ. अशा एकूण 12 ठिकाणी 13 लक्ष 18 हजार 392 रुपयांमधून नविन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.

तालुका लोकशाही दिन 16 मार्चला

गोंदिया :  उपविभागीय अधिकारी गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली 16 मार्च 2020 रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय गोंदिया यांचे सभा कक्षात तालुका लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनानिमित्ताने जनतेच्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी ऐकूण निपटारा करण्यात येईल. असे अप्पर तहसिलदार ए.डब्ल्यू.खडतकर यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात कलम 37 (1) (3) लागू      

गोंदिया : 14 ते 28 मार्च 2020 या कालावधीत जिल्ह्यात विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहे. तसेच 25 मार्च रोजी गुढीपाडवा, त्याचप्रमाणे जिल्ह्यात एचएससी-एसएससी परीक्षा व करण्यात येणारे सणानिमीत्त ठिकठिकाणी मिरवणूक काढण्यात येतात. त्‍यादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुरक्षीतता अबाधित राखण्याच्या दृष्टीने 14 मार्चपासून ते 28 मार्च 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी श्रीमती स्मिता बेलपत्रे यांनी लागू केले आहे. अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.