41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News गृहमंत्र्यांच्या दौ-यापूर्वी सुकमामध्ये दोन बॉम्ब सापडले

गृहमंत्र्यांच्या दौ-यापूर्वी सुकमामध्ये दोन बॉम्ब सापडले

0
23

रायपूर – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या छत्तीसगड दौ-यापूर्वी सुरक्षा पथकांना शनिवारी सुकमा जिल्ह्यातील द्रोणापाल भागात दोन शक्तीशाली बॉम्ब सापडले.
सुकमा-द्रोणापाल मार्गावरील मिसमा गावामध्ये जेवणाच्या डब्ब्यामध्ये हे बॉम्ब सापडले.
मिसमा गाव द्रोणापाल पोलिस स्थानकाच्या हद्दीत येते. केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जिल्हा पोलिस पथक सुकमा-द्रोणापाल मार्गावर गस्तीवर असताना आयईडी स्फोटकांनी भरलेले दोन डब्बे नजरेस पडले. प्रत्येक डब्बा १० किलो आईडी स्फोटकांनी भरलेला होता.
बॉम्ब शोधक पथकाने तात्काळ घटनास्थळावर पोहोचून दोन्ही बॉम्ब निकामी केले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या दोन दिवसीय छत्तीसगड दौ-याला शनिवारपासून सुरुवात होत आहे. राजनाथ सिंह सर्वप्रथम रायपूरला जाणार आहेत त्यानंतर नक्षलप्रभावित बस्तर, सुकमा येथेही त्यांचे कार्यक्रम आहेत.

blank