वन रँक-वन पेंशन योजना लागू करणार, ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांचे आश्वासन

0
16

नवी दिल्ली दि.३१: – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशातील जनतेसोबत आठव्यांदा संवाद साधला. आकाशवाणीवरील या कार्यक्रमातून त्यांनी भारतातील आजी-माजी सैनिकांसाठी वन रँक – वन पेंशन योजना लागू केली जाईल याचा पुनरुच्चार केला. नेपाळ मध्ये आलेला भूकंप आणि यमन मधील संकट यातून भारतीय नागरिकांना सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचे कौतूक केले.

पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मधील महत्त्वाचे मुद्दे
– उन्हाच्या काहिलीने पशु-पक्षांचे हाल होत आहेत. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करा.
– उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
– विद्यार्थ्यांनी त्यांची आवड आणि योग्यतेनुसार विषयांची निवड करावी.
– देशाला उत्तम सैनिक, शिक्षक आणि खेळाडूंची गरज आहे.
– अनेकदा आपण अपयशातून शिकत असतो. त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. नक्कीच मार्ग सापडेल.
– माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना पायलट होण्याची इच्छा होती, मात्र ते महान शास्त्रज्ञ झाले आणि राष्ट्रपती होऊन त्यांनी देशाची सेवा केली.
– परीक्षेत अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांनी नवा मार्ग शोधला पाहिजे. कुटुंबीयांनी त्यांच्यावर दबाव टाकू नये.
– आमच्यामध्ये गरीबांसाठी काम करण्याची आंतरिक इच्छा आहे.
– जीवन ज्योती, अटल पेंशन आणि अपघात वीमा यांचा फायदा देशातील गरीबांना होईल.
– देशात शेतकरी चॅनल सुरु झाले पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल.
– 21 जून रोजी जागतिक योग दिवस साजरा होईल. 100 दिवसांमध्ये 117 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. आता आमची जबाबदारी आहे, की त्याला पुढे घेऊन जाणे.
– योगाने जगाला जोडण्याचे काम केले आहे. आता आम्ही योगाचे दूत झालो पाहिजे.
– वन रँक – वन पेंशन योजना लागू करण्याचे आम्ही आश्वासन दिले होते, ते आम्हीच पूर्ण करणार. त्यावर काम सुरु झाले आहे.
– चाळीस वर्षांत अनेक सरकार आले आणि गेले त्यांनी फक्त आश्वासन दिले काम कोणी केले नाही.
– वन रँक – वन पेंशन हा विषय मागील सरकारांनी जटील करुन ठेवला आहे.
– सुट्यांमध्ये बाहेरगावी फिरायला गेल्यानंतर डायरी लिहा.