31 मार्च 2020 पर्यंत होणार्‍या MPSC च्या परीक्षा स्थगित

0
312

मुंबई,15 मार्च – राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3, व 4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी म्हणून राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आदेश देत त्यांच्या अंतर्गत 31 मार्चपर्यंत होणार्‍या सर्व परीक्षा तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून कोणत्याही कारणास्तव होणारी गर्दीस प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे 31 मार्च 2020 पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात असे आदेश सक्षम प्राधिकार्‍यांच्या मान्यतेने महाराष्ट्राचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिले आहेत. त्यामुळे 31 मार्च 2020 पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या सर्व परीक्षांना स्थगिती मिळणार आहे.