41.1 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home राजकीय मतभेद विसरून येत्या निवडणुकीत विजयासाठी एकत्र या-जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर

मतभेद विसरून येत्या निवडणुकीत विजयासाठी एकत्र या-जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर

0
251

लाखांदूर,दि.18: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या पुर्वतयारीला सुरवात केली असून काँग्रेसनेही तालुका व ब्लाॅकबैठकांच्या माध्यमातून पक्ष कार्यकर्त आणि पदाधिकाऱ्यांना आपसातील मतभेद बाजूला सारून पक्षाच्या बळकटीसोबतच विजयासाठी एकत्र यावे असे आवाहन भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केले आहे.

ते लाखांदुर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा परिषद क्षेत्र पिंपळगाव व सोनी क्षेञाच्या आयोजित बैठकीत बोलत होते.लाखांदूर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने पिंपळगाव व मोहरणा जिल्हा परिषद व सोनी, पिंपळगाव, कुडेगाव आणि मोहरणा क्षेञातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. ही बैठक भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली,जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष तथा लाखांदुर तालुका निरीक्षक मोहन पंचभाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी, निवडणुकीबाबत मार्गदर्शन करून कार्याचा आढावा घेतला.गावागावात आपले संघटन तयार करुन ग्राम काँग्रेस कमिटीच्या वतीने गावाच्या सुरुवातीला दर्शनी भागावर स्वागत फलक लावण्याच्या सुचना केल्या.तसेच काँग्रेसने केलेले कार्य पटवून देत येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सुचना केल्या. लाखांदुर तालुक्यात मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या सहा पैकी पाच तर पंचायत समितीच्या बारा पैकी सात जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. त्यामुळे आगामी निवडणुकात आपण जास्त मेहनत घेऊन पुर्ण जागा जिंकण्याच्या विचार त्यांनी व्यक्त केले.

या बैठकीला तालुका अध्यक्ष भुमेश्वर महावाडे, तालुका समन्वयक उत्तम भागडकर, जिल्हा परिषद सदस्य शुध्दमता नंदागवली, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, गटनेते रामचंद्र राऊत, संचालक सुरेश ब्राम्हणकर, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देशमुख, महासचिव लेकराम ठाकरे, पिंपळगाव जि. प. सर्कल प्रमुख रामचंद्र परशुरामकर, मोहरणा जि. प. सर्कल प्रमुख विलास पिलारे, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा लता प्रधान, लालप्रसाद गोंडाणे, निलकंठ पारधी, मुखरु दुपारचे, हिरालाल लांडगे, सरपंच मुनेश्वर दिवठे, अमर भाणारकर, गोपिचंद राऊत, तुळशीदास खरकाटे, सरपंचा मंगला शेंडे, सरपंच सुमेध रामटेके, डाकराम बुरडे, प्रभाकर राऊत, उपसरपंच देशपांडे, बा. स. संचालक मनोज मेश्राम, टारजन बुरडे, स्वप्नील ठेगरी, सुनिल कुत्तरमारे, पप्पू मातेरे, यादव परशुरामकर जसाराम पुस्तोडे, चोपराम परशुरामकर व क्षेत्रातील सर्व गावांचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.संचालन सरपंच उत्तम भागडकर, प्रास्ताविक भुमेश्वर महावाडे यांनी तर आभार प्रदर्शन लेकराम ठाकरे यांनी मानले.