गोंदिया,दि.२५ः- कोरोणा व्हायरस पसरू नये म्हणून शासनस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत.त्याचाच एक भाग म्हणून कलम १४४ अंतर्गत पाचपेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी येण्यावर बंदी घालण्यात आल्याने अघोषित कफ्र्यु लागू झालेला आहे.निर्मनुष्य रस्ते, कामकाज ठप्प झाले असून फक्त दवाखाने आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू. अशा अवस्थेत पाठीवर पोट घेऊन जगणाèया लोकांना उपासमारीला तोंड देण्याची वेळ आली आहे.ज्यादिवशी मजुरी नाही त्या दिवशी त्यांच्या घरची चूल पेटणार नाही,अशासांठीही शासन नक्कीच व्यवस्था करेल तेव्हा करेल परंतु आपण आधी त्यांची सोय करावी या हेतून आमदार विनोद अग्रवाल यांनी कुडवा येथील अण्णाभाऊ साठेनगरातील कचरा गोळा करुन पोट भरणाèया मांग गारुडीसमाजासांठी स्वखर्चाने किराणा साहित्याचे वाटप करुन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.मानवतेचे ऋणानुबंध जोपासण्यासाठी प्रत्येक कुटुंबाच्या झोपडीत अन्नधान्याचे वाटप केले.यावेळी त्यांच्यासोबत सविता बेदरकर,उदय पोफळी,धनेंद्र भुलले उपस्थित होते.सोबतच शिक्षिका नानन बिसेन यांनी प्रत्येक परिवाराला तुरीची डाळ दिली.