विशेष लेख:
आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या सामाजिक, आर्थिक ,सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करणारा जागतिक दिवस आहे .हा दिवस महिलांवरील अन्याय,अत्याचार कमी करण्यासाठी कृती करण्याचे आवाहन देखील करतो.राष्ट्रीय, जातीय ,भाषिक सांस्कृतिक ,आर्थिक किंवा राजकीय विभाजनाचा विचार न करता महिलांना त्यांच्या कर्तृत्वासाठी ओळखले जाते असा हा दिवस आहे.
1908 न्यूयॉर्कमध्ये 8 मार्च रोजी पंधरा हजार महिलांनी रस्त्यावर उतरून एक मोठे आंदोलन केले होते , या आंदोलनात प्रमुख तीन मागण्या होत्या,पहिली मागणी *मतदानाचा अधिकार* , दुसरी मागणी होती *कमी तासाची नोकरी* आणि तिसरी मागणी *चांगल्या पगाराची नोकरी मिळावी* , अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी 144 वर्ष वाट पहावी लागली तर ब्रिटनमध्ये महिलांना 100 वर्ष वाट पहावी लागली, भारतीय संविधानाने कलम 326 अंतर्गत मतदानाचा अधिकार हा भारतातील घटनात्मक अधिकार आहे, अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना त्यांचे लिंग जात, धर्म, किंवा वर्ग विचारात न घेता मतदानाचा अधिकार आहे, कामाचे तास म्हणजे एखाद्या व्यक्तीने सशुल्क कामावर खर्च केलेला कालावधी. भारतात कामगार कायद्यानुसार कर्मचाऱ्यांसाठी कामाचे तास निश्चीत केले जातात, जे कुशल व अकुशल कामगारांना लागु होतात.भारतातील कर्मचारी एका प्रमाणित वर्क आठवड्यात 48 तास काम करु शकतात, दररोज 8 ते 9 तास.चांगल्या पगाराची नोकरी महिलांना मिळावी ही मागणी म्हणजे पुरुष व स्त्रियांच्या पगारात, मजुरीत फरक आहे, पुरुषासारखे महिला काम करत असेल तर समान काम ,समान पगार असायला हवा.
रशियाच्या महिलांनी महिला दिवस साजरा करत पहिल्या विश्वयुध्दाचा विरोध केला होता, ब्रेड अॅन्ड पीस साठी रशियन महिलांनी 1917 मध्ये आंदोलन केले, तर युरोप मध्येही महिलांनी 8 मार्च रोजी शांतीचं समर्थन करण्यासाठी रॅली काढली,1958 मध्ये क्रिस्टीना एफ लुईस यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे प्रथम आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. जागतिक पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न सुरू होते, याच विविध कारणाने संयुक्त राष्ट्राने 8 मार्च 1975 रोजी जागतिक महिला दिनाला मान्यता दिली.
जागतिक महिला दिन सन्मान देण्यासाठी, महिला सशक्तिकरण आणि मुला-मुली मधील भेदभाव दूर करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.दरवर्षी या दानाची वेगळी थीम असते, मार्च महिन्यात विविध कार्यक्रम आयोजन केले जातात, 2024 ची थीम “महिलांमध्ये गुंतवणुक करा, प्रगतीला गती द्या “.होती, यावर्षीची थीम “ॲक्सिलरेट ॲक्शन ” लिंग समानतेमध्ये जलद प्रगतीचे आवाहन करते. “तसेच महिलादिनाची यावर्षीची घोषणा आहे “सशक्त महिला, जगाला सक्षम करा! “
समान हक्क, समान संधी, समान भविष्य, सामर्थ्य लवचिकता आणि कृपा -सर्वत्र महिलांचा उत्सव साजरा करणे,
महिलांशी संबधीत विशेष मुद्दे घेवुन, त्यावर काम करणे आणि त्यांच्या हक्काबद्दल बोलणे हा महिला दिनाचा हेतू आहे,
2017 मध्ये सर्व्हेत महिला पुरुषांमधील असमानता संपन्यासाठी अजुन 100 वर्ष लागण्याची शक्यता दर्शविली,
जागतिक आर्थिक मंचाच्या आकडेवारी नुसार प्रगतीच्या सध्याच्या दराने, पुर्ण लिंग समानता गाठण्यासाठी 2158 पर्यंत म्हणजेच आतापासून सुमारे पाच पिढ्या लागतील, व्यक्ती म्हणून, आपण सर्वजन आपल्या दैनंदिन जीवनात महिलांच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम करण्यासाठी पावले उचलू शकतो, आपण रुढीवादी विचारांना आव्हान देवु शकतो, प्रश्न विचारू शकतो, महिलांचे यश साजरे करु शकतो याव्यतिरिक्त, आपले ज्ञान आणि प्रोत्साहन इतरांसोबत शेअर करणे महत्त्वाचे आहे, चांगल्या गोष्टींना पाठिंबा देणे, महिला व मुलींना त्यांच्या आरोग्याबद्दल माहितीपुर्ण निर्णय घेण्यास मदत करणे, शाश्वत शेती आणि अन्न सुरक्षेमध्ये महिला आणि मुलींना सहभागी करुन घेणे, महिला, मुलींना दर्जेदार शिक्षण व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, खेळात सहभाग व कामगीरी वाढवणे, महिला व मुलींच्या सर्जनशील आणि कलात्मक प्रतिभेला प्रोत्साहन देणे, सर्वांनी चांगल्या विचारांनी एकत्रित कृती करणे, महिलांवरील अन्याय, अत्याचारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि ती वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन ही एक संधी आहे.
आपण स्त्री किंवा पुरुष म्हणून कसे आहोत हे समाज ठरवते, जर आपल्याला हे फरक अन्याय आणि अनावश्यक वाटत असतील तर ते आपण बदलू शकतो फक्त जैविक आरोग्य बदलता येत नाही जर आपण समतेवर आणि न्यायावर आधारित समाज निर्माण करण्याचे प्रयत्न करत असू तर आपल्याला सामाजिकरण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल घडवण्याचे काम करावे लागेल त्यामुळे स्त्रिया आणि पुरुष यांना समान दर्जा मिळू शकेल.
आजही महिला व मुलींच्या सुरक्षेतेचा प्रश्न आहे, स्त्री घरात दारात, समाजात सुरक्षीत नाही, आजही महिला विरोध करायला घाबरतात, दैंनिक वृत्तपत्रात, सोशिअल मेडिया वर महिला व मुलीवर होणारा अत्याचार, बलात्कार, लैंगिक शोषण, इ बातम्या दररोज वाढतच आहे, कित्येक घटनांची नोंद होत नाही,
समाजात चांगले वातावरण निर्माण होण्यासाठी सर्वांनी एकत्रित पुढाकार घेणे आवश्यक आहे,मुलीसह, मुलांना, पुरूषांना संस्कार व उत्तम शिक्षण देणे गरजेचे आहे, शेजारी असो, गावात असो,प्रवासात/बस मध्ये असो शाळेत असो,हाॅटेल असो, वसतीगृह असो ,कार्यालयात असो कि कुठेही सार्वजनिक ठिकाणी असो सर्वत्र एक मदतीचा आवाज, बोर्ड असायला हवा, नियमित सुरक्षेबाबतची जाहिरात सुरू असायला हवी,कोणी अत्याचार, बळजबरी केली तर आवाज दिल्यावर धावून येणारी सामाजिक प्रभावशाली मनुष्यफळी असायला हवी , जिथे जिथे जे जे वाईट दिसते तिथे तिथे लगेच विरोध झाला पाहिजे,
समाजात एक चांगले वातावरण निर्माण झाले पाहिजे, प्रेम, बंधुभाव व नैतिकता वाढली पाहिजे, कारण स्त्री सुरक्षीत तर राष्ट्र सुरक्षित व सक्षम राहील, राष्ट्रविकासात महिलांचा वाटा व योगदान महत्वाचे आहे,
*आदिशक्ती तु,
मनुष्य निर्मिक तु, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तु,
आजच्या युगाची प्रगती तु..
स्त्री आहे म्हणून विश्व आहे, स्त्री आहे म्हणून सुंदर नाती आहे, स्त्री आहे म्हणून सर्व नात्यात प्रेम आहे.म्हणून तिचा सन्मान करणे सर्वांचे कर्तव्य आहे,
चुकलेल्या शब्दांना क्षमस्व…
*जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा…*
वर्षा ठाकरे (भगत)कारंजा लाड