34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ सहकारी भाग गिरणी सौंदडने दिले मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपये

सहकारी भाग गिरणी सौंदडने दिले मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपये

0
199

blank

सडक अर्जुनी,दि.01ः तालुक्यातील सहकारी भात गिरणी सौंदडच्या संचालक मंडळाने एक मताने निर्णय घेऊन मुख्यमंत्री सहायता covid-19 सहाय्यता निधीला एक लाख रुपये दिले आहे. एक लाख रुपयाचा धनादेश खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या स्वाधीन भात गिरणीचे अध्यक्ष रमेश चुऱ्हे यांनी केले.यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, अविनाश काशीवार अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती सडक अर्जुनी हे उपस्थित होते. सहकारी भात गिरणी सौंदडची संचालक मंडळाची बैठक घेऊन कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव राज्यात असून, सरकार विविध उपाययोजना करीत आहे.आपलाही हातभार लागावा, यासाठी संचालक मंडळाने एक मताने एक लाख रुपये मुख्यमंत्री covid-19 सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला. यावेळी अध्यक्ष रमेश चुऱ्हे, उपाध्यक्ष के.जी.बोधनकर, संचालक राजाभाऊ गूब्रेल, प्रभुदयाल लोहीया, हितेंद्र लवंगाणी, सुखदेव कोरे, चरण सहारे, हेमराज कोरे, बळीराम चांदेवार, पतिराम परशुरामकर, ईश्वरदास सयाम ,रामदास कापगते, संजय बैस, उषाबाई येडे, पुष्पा निर्वाण हे बैठकीत उपस्थित होते.

blank