34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ आज 4 रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह,जिल्ह्यात आतापर्यंत 32 रुग्ण

आज 4 रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह,जिल्ह्यात आतापर्यंत 32 रुग्ण

0
2566

blank

गोंदिया,दि.22 : गोंदिया शहरातील गणेशनगर परिसरातील एका तरूणाला कोरोना विषाणूची लागण झाली होती. उपचाराअंती त्याचे नमुने निगेटिव्ह आल्याने तो करोनामुक्त झालेला आहे.आज शुक्रवारला(दि.22) परत जिल्ह्यात 4 रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.तर 21 मे रोजी 26 आणि 19 मे रोजी 2  रुग्ण आढळून आले होते,असे आता 32 रुग्ण जिल्ह्यात पाॅझिटिव्ह असून 1 रुग्ण निगेटिव्ह यापुर्वी झालेला आहे. 21 मे रोजी जिल्ह्यात एकासोबत 26 नवे रुग्ण आढळल्याबरोबर जिल्हा रेडझोनमध्ये गेलेला आहे. पाॅझिटिव्ह आलेले रुग्ण हे मुंबई,पुणे येथून आलेले आहेत.आज  पाॅझिटिव्ह आलेला अहवाल गोरेगाव 2, सालेकसा १ व  अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ रुग्णांचा आहे.गोरेगाव तालुक्यातील संबधित गणखैरा गाव हे कंटेनमेंट मध्ये आले असून गोरेगाव तहसिलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतला भेट देत सर्व पाहणी केली आहे.सोबतच रस्ते बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यातून आतापर्यंत 518 लोकांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते,त्यापैकी 451 अहवाल प्राप्त झाले असून 67 नमुन्यांचा अहवाल होता.अर्जुनी मोरगाव सडक अर्जुनी तालुक्यात रुग्ण आढळल्याने सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगपार दल्ली,पांढरवाणी,डोंगरगाव,केसवलेवाडा,तिडका,कोदामेडी,सडक अर्जुनी,सावंगी,बाम्हणी,कोहमारा,सालईटोला,कन्हारपायली व उशीखेडा या गावांचा कंटेनमेंट झोन म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.तसेच बफऱ झोनमध्ये सुध्दा काही गावांचा समावेश अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केले आहे.

गोंदिया जिल्हा करोना रिपोर्ट

मोरगाव अर्जुनी – 23
सडक अर्जुनी – 05
गोरेगाव – 02
सालेकसा – 01
आमगाव – 01

एकूण- 32 रूग्ण

blank