विषारी वायूगळतीने आमगावात चौघांचा मृत्यू

0
2276

आमगाव ,दि०२:: :- अंगणातील विहिरीतील विषारी वायूमुळे चौघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली.तालुक्यातील पानगावात ही घटना घडली असून आजच या विहिरीचे वास्तू पूजन होते. मात्र, त्याच विहिरीने चौघांचे बळी घेतले.भैयालाल भांडारकर,झनक आत्माराम भांडारकर,आत्माराम भांडारकर व धनराज गायधने कण्हरटोला असे मृतकाचे नाव असून आत्माराम भांडारकर यांनी आपल्या घरच्या शेतात विहीर खोदली असता विहीरीचे पूजन करण्यासाठी पाच जण शेतात गेले होते. तेव्हा विहीतील मोटरपंपचा फुटबाँल दुरूस्त करण्यासाठी झनक हा विहीरीत उतरला मात्र बाहेर आलाच नसल्याने त्याला पाहण्यासाठी एका मागोमाग एक एक करीत सर्व जण विहीरित उतरले मात्र परत आलेच नाही.दरम्यान पाचवा व्यक्ती विहीरीतून अध्र्यातूनच बाहेर आल्याने त्याचे प्राण वाचले. या घटनेची माहीती मिळताच पोलिस प्रशासन अग्नीशमन दलासह घटनास्थळी दाखल झाला असून मृतकाचे मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे.विहीरीत गँस निर्माण झाल्याने चौघांचा जीव गुदमरुन मृत्यू झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसारली आहे.