
सडक अर्जुनी,दि.04ः- राष्ट्रवादीचे नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी आज(दि.4)कोहमारा येथे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात तालुक्यातील शेतकरी,नागरिक व पक्ष पदाधिकायांशी भेंट घेऊन चर्चा केली. यावेळी नागरिकांनी त्यांच्या समक्ष विविध विषय मांडले. खा. पटेल यांनी या वेळी शेतकरी बांधव व सामान्य नागरिकांच्या विविध समस्यां त्वरीत निकाली काढण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याची सूचना पक्ष पदाधिकार्यांना दिली. यावेळी चर्चा करण्यात आलेल्या विविध समस्यांवर संबंधित अधिकार्यान्शी दुरध्वनी वर चर्चा करुन निर्देश दिले.या बैठकीला आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी खासदार खुशाल बोपचे, पक्ष नेता गंगाधर परशुरामकर, डाॅ. अविनाश काशीवार, देवेंद्रनाथ चौबे, नगराध्यक्ष देवचंद तरोणे, नरेश भेंडारकर, रजनी गिर्हेपुंजे सोबत नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.





