
गोंदिया, दि.7 : जिल्ह्यात युरिया खरेदी करतांना जास्त दराने कृषी केंद्र चालकाकडून विक्री होत असल्याचे लक्षात आल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी केले आहे.
युरिया खताची किंमत 266 रुपये प्रति बॅग आहे. जर जिल्ह्यातील कोणत्याही कृषी केंद्र चालकांकडून जास्त दराने युरियाची विक्री होत असल्यास संबंधित तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.
शेतकऱ्यांनी रासायनिक खते खरेदी करतांना अदा केलेल्या रकमेचे विक्रेत्यांकडून पक्के बिल घ्यावे. खत विक्रीबाबत कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्यास शेतकऱ्यांनी कृषी विकास अधिकारी मनोहर मुंडे (9730539977) आणि जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक बाळासाहेब गिरी (9403727393) यांच्याशी संपर्क साधावा.




