35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ एचडीएफसी एर्गोकडून महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजनेची अंमलबजावणी

एचडीएफसी एर्गोकडून महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजनेची अंमलबजावणी

0
161

भंडारा , जुलै, २०२०: एचडीएफसी एर्गो जनरल विमा कंपनी या भारताच्या खासगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या बिगर जीवन विमा पुरवठा कंपनीला महाराष्ट्र सरकारने प्रधान मंत्री फसल बीमा योजना (पीएमएफबीवाय) २०२० च्या खरीप हंगामासाठी पालघर, रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली, अकोला आणि भंडारा या जिल्ह्यांतील कर्जदार  आणि विना -कर्जदार शेतकऱ्यांसाठी अधिकृत केले आहे.

खाली दिलेल्या तक्त्यात नमूद केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या योजनेनुसार अधिसूचित केलेल्या पिकांसाठी ही योजना जिल्ह्यात राबविली जाईल.

जिल्हा अधिसूचित पिके अंतिम तारीख
पालघर, भात,उडीद,रागी  

 

 

 

३१ जुलै २०२०

 

 

 

 

रायगड भात,रागी
धुळे भात,उडीद,रागी,ज्वारी,बाजरी,सोयाबिन,तीळ,,मूग,कापूस,कांदा,शेंगदाणा,तूर ,मका
पुणे भात,उडीद,रागी,ज्वारी,बाजरी,सोयाबिन,शेंगदाणा,तूर,मूग कांदा
औरंगाबाद उडीद,ज्वारी,बाजरी,सोयाबिन,कापूस,मका,तूर,मूग कांदा
हिंगोली उडीद,ज्वारी,सोयाबिन,कापूस,तूर,मूग
अकोला उडीद,ज्वारी ,सोयाबिन ,कापूस,तूर,मूग
भंडारा भात ,सोयाबिन

पीएमएफबीवाय योजना दुष्काळ, पूर, कोरडे गवत, भूस्खलन, चक्रीवादळ,  कीटक, रोग आणि इतर अशा विस्तृत बाह्य जोखमीमुळे पिकांच्या उत्पन्नातील कोणत्याही नुकसानाविरूद्ध विमा देते . उत्पादनातील तोटा निश्चित करण्याच्या उद्देशाने राज्य सरकार या योजनेसाठी अधिसूचित केलेल्या भागातील अधिसूचित पिकांवर पीक कापणी प्रयोग (सीसीई) घेण्याची योजना आखेल. सीसीई घेतलेल्या उत्पन्नाची आकडेवारी जर कमी झाली असेल तर शेतकऱ्यांना  त्यांच्या उत्पन्नातील तूट सोसावी लागली तर दावे शेतकऱ्यांना दिले जातील.

ही पिकांची पूर्व पेरणी, काढणी आणि काढणीनंतरच्या जोखमीसह पीक चक्रातील सर्व टप्प्यांसाठी विमा संरक्षण उपलब्ध करुन देते.पीएमएफबीवाय योजनेतील सर्व उत्पादने कृषी विभागाने मंजूर केली आहेत. पालघर, रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली, अकोला आणि भंडारा या जिल्ह्यातील शेतकरी आपापल्या जिल्ह्यातील संबंधित बँकांमध्ये,सामान्य सेवा केंद्रांकडे (सीएससी) संपर्क साधू शकतात किंवा पीएमएफबीवाय योजने अंतर्गत वरील पिकांसाठी विमा संरक्षण मिळविण्यासाठी अधिकृत एचडीएफसी एर्गो एजंटशी संपर्क साधू शकतात.विमा संरक्षण मिळविण्यासाठीच्या वैधता कालावधीचा तपशील कृषी विभागाच्या वेबसाइटवर शेतकऱ्यांसाठी  उपलब्ध असेल. या योजनेंतर्गत कव्हर मिळण्याची अंतिम  तारीख ३१ जुलै २०२० आहे.

blank