38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता पोलिसांनी २४ तासातच उघड केला गुन्हा

पोलिसांनी २४ तासातच उघड केला गुन्हा

0
736

blank

गोंदिया,दि.11ः- रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह काटी येथे ८ जुलै रोजी मिळाला. त्या युवकाची हत्या की आत्महत्या हे खलबत्ते सुरू असतांना पोलिसांनी तपास चक्र फिरवून या प्रकरणाचा छळा लावून अवघ्या २४ तासात आरोपीला पकडून त्याला ताब्यात घेतले. यामुळे त्या युवकाची आत्महत्या नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. भुमेश्वर प्रभु चौधरी (३५)रा.काटी असे मृताचे नाव आहे.
गोंदिया तालुक्यातील काटी येथे ३५ वर्षीय युवक ६ जुलै रोजी सकाळी १० वाजतापासून बेपत्ता होता. दरम्यान आरोपी
अनिल राधेलाल भगत याच्यासोबत त्याचे जुने वाद होते. या वादातूनच आरोपी अनिल याने मृतकाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारून त्याची हत्या केली. व त्याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य वेंâद्रासमोरील एका बंद हॉटेलमध्ये पेâवूâन दिला होता. दरम्यान हे प्रकरण ८ जुलै रोजी निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. भुमेश्वर चौधरीची हत्या की आत्महत्या याचा उलगडा करणे पोलिसांसमोर एक आवाहनच होते. पोलिसांनी तपास चक्र फिरवून त्या प्रकरणाचा छडा लावला. व आरोपी अनिल भगत याला ताब्यात घेतले. हे प्रकरण पोलिस अधिक्षक मंगेश शिंदे, पोलिस अप्पर
अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन वाघडे,जगदिश मेश्राम, राजु वरखडे, संजय चव्हाण, ईश्वर ढेकवार, शेखर पटले, राहुल बोबांर्डे आदिंनी प्रकरणाचा छडा लावला.तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूध्द
हत्येचा गुन्हा नोंद केला आहे.

blank