
गोंदिया,दि.11ः गोंदिया जिल्ह्यातील विविध समस्या व प्रश्नांना घेऊन विधानपरिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन देऊन चर्चा केली.भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बदल झाल्यानंतर फुके पहिल्यांदा गोंदियात आले असता त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, घरगुती व कृषी विज बिल सरसकट माफ करण्याबाबत, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजने बाबत, आधारभूत धान खरेदी बाबत, पीक कर्ज वाटप करणे बाबत, रेती माफिया वर कार्यवाही बाबत, पीएम किसान सन्मान योजनेबाबत, स्वस्त धान्य योग्य वाटप बाबत, अशा विविध विषयांवर जिल्हाधिकारी सोबत जिल्हाधिकारी कार्यालया चर्चा केली.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष केशव मानकर, आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार संजय पुराम, विरेन्द्र अंजनकर, अल्ताफ हामिद, विश्वजीत डोंगरे, संतोष तिवारी, नरेंद्र तुरकर, , जिल्हा परिषद सदस्य, नगर पंचायत सदस्य उपस्थित होते.





