43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता कामगाराला ठार करणारा पेट्रोलपंप चालक अद्यापही फरारच,पोलिसांची भूमिका संशयास्पद

कामगाराला ठार करणारा पेट्रोलपंप चालक अद्यापही फरारच,पोलिसांची भूमिका संशयास्पद

इंदोरा पेट्रोल पंपावरील घटना दवनीवाडा पोलीस ठाणेदाराची भूमिका संशयास्पद

0
524

blank

गोंदिया,दि.11ः-तिरोडा तालुक्यातील इंदोरा येथील सुजित जायस्वाल यांच्या पेट्रोल पंपावर कामावर असलेल्या एका कामगाराला बेदम मारहाण करुन ठार करण्यात आल्याची घटना (दि.8)बुधवारला सकाळी उघडकीस आली.दरम्यान या घटनेला तीन दिवसाचा काळ लोटूनही दवनीवाडा पोलिसांनी आरोपी पेट्रोलपंप चालक सुजित जायस्वालला अद्यापही अटक न केल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसून येत आहे.दवनीवाड्याचे पोलीस निरिक्षक गणेश धुमाळ यांना विचारणा केल्यावर आरोपींचा शोध सुरुच असल्याची टेप त्यांच्या तोंडून एैकायला येत असल्याने याप्रकरणात पोलीस विभागाच आरोपीला न्यायालयातून अग्रीम जमानत मिळावी यासाठी अटक करण्यात टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.विशेष म्हणजे तिरोड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस अधिक्षकांसह स्थानिक गुन्हे शाखेनेही अद्याप या प्रकरणात पेट्रोलपंप चालकाला पकडण्यासाठी काय कारवाई केली याची माहिती मिळू शकलेली नाही.त्यातच तिरोडा तालुक्यात पेट्रोलपंप चालकाने पोलीस व मृतकाच्या कुटुबियांना सेट केल्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे.

तालुक्यातील इंदोरा शिवारातील पेट्रोल पंप येथे घडली. उमेश सखाराम पारधी (२४)रा. सेजगाव असे मृताचे नाव आहे. तर आरोपीचे नाव सुजित जायस्वाल रा. फुलचूर, गोंदिया असे आहे. तिरोडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला,मात्र आरोपीचा अद्यापही सुगावा न लागणे हे शंका निर्माण करणारे ठरले आहे.
सविस्तर असे की, इंदोरा शिवारात आरोपी सुजित जायस्वाल यांचा आराध्य फ्यूल नावाने पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंप वर मृतक उमेश पारधी कामगार म्हणून कार्यरत होते. दरम्यान काही कालावधीपासून मृतक उमेश पारधी याने हिशोब केले नव्हते. या कारणावरून पंपचे संचालक सुजित जायस्वाल व कामगार उमेश पारधी याच्यामध्ये वाद निर्माण झाला. त्यातच (दि.७) सायंकाळी संचालक सुजित जायस्वाल हे पंपावर असतांना यांनी मृतक उमेशला हिशोब देण्याची मागणी केली. दरम्यान जायस्वाल यांनी उमेशला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या उमेशला जायस्वाल यांनीच गोंदिया येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र रात्री ९.३० वाजताच्या सुमारास उमेशचा रुग्णालयाद मृत्यू झाला. घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी दवनीवाडा पोलिस ठाण्यात रात्रीच धाव घेतली. मात्र पोलिसांनी घटनेच्या वेळेपासूनच प्रकरण दाबण्यासाठी काम केल्याचे त्यांच्या कार्यप्रणालीवरुन दिसून येत असून दवनीवाडा पोलीस आरोपीला अटक करतील याबाबत शंका निर्माण झाली आहे.

blank