43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News सचिन पायलट यांची प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी

सचिन पायलट यांची प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी

0
1068

blank

दिल्ली(वृत्त संस्था) राजस्थानमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये काॅंग्रेसने आज दिल्ली मध्ये मोठा निर्णय घोषित केला आहे.पक्षाशी अंतर राखून वेगळा विचार करण्याच्या तयारीत असलेल्या राजस्थानच्या  प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्रीपदवरून सचिन पायलट यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे.काॅंग्रेसचे नेते रणदिप सिंग सुरजेवाला यांनी आज दिल्लीमध्ये पार पडलेल्य बैठकीनंतर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून हटवल्याची घोषणा केली.

राजस्थानात सध्या वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. यादरम्यान, सचिन पायलट यांना मंगळवारी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून काढण्यात आले. पक्षाच्या या निर्णयानंतर पायलट यांची पहिली प्रतिक्रीया आली आहे. सचिन पायलट यांनी आपल्या ट्विटर हँडलवपर एका ट्वीटमध्ये म्हटले की, ‘सत्य को परेशान किया जा सकता है, पराजित नहीं.’ सचिन पायलट यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर ही पहिली थेट प्रतिक्रीया आहे.

सचिन पायलट यांचे ट्वीट

मंगळवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आमदारांची दुसरी बैठक बोलवली होती. यापूर्वी सोमवारी काँग्रेसने सचिन पायलट यांना पक्षाने चर्चा करण्यासाठी आमंत्रण दिले होते. त्यांना सांगण्यात आले होते की, पक्षाचे दार त्यांसाठी अजूनही खुले आहेत. पण, मंगळवारी(ता.14) झालेल्या बैठकीलाही पायलट उपस्थित झाले नाही. यानंतर बैठकीत सर्वांच्या मागणीनंतर पायलट यांच्यासह त्यांचे समर्थक विश्वेन्द्र सिंह आणि रमेश मीणा यांना हटवले.

blank