
गोंदिया,दि.14- आमदार विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात ३०० युनीटचे विज बिल माफ करण्यासाठी १४ जुलै रोजी गोंदिया येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा आयोजित करुन निवेदन देण्यात आले.लॉकडाऊन दरम्यान मीटर रीडिंग न घेताच अंदाजाने बिल पाठवण्यात आले. त्यामुळे बरेच नागरिकांना चुकीचे बिल आल्याने त्यांची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.याच्या निषेधार्थ १४ जुलै रोजी वीज वितरण कार्यालय गोंदिया येथे धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता,यात गोंदिया तालुक्यातील व शहरातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावली होती.विज बिल धारक आपले वीजबिल सोबत घेऊन मास्क घालून सहभागी झाले होते.विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना उपस्थित होत आमदार अग्रवाल यांचे निवेदन स्विकारले.यावेळी घनश्याम पानतवणे,भाऊराव उके,दिपक बोबडे,मुनेश रहागंडाले आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.





