
अमरावती,दि.16:शहराच्या गजबजलेल्या जयस्तंभ चौक परिसरातील गांधी मार्केट ही जुनी इमारत रात्री 2 वाजता कोसळली. इमारत खुप जुनी झाली होती. यात 15 दुकाने होती. महापालिकेच्या अग्निशामक पथकाने दोन जिवंत लोकांना बाहेर काढून इर्विन रुग्णालयात दाखल केले. या घटनेत दोघे जखमी झाले आहेत.कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे ही इमारत कोसळली.





