39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ श्रीकृष्णनाथ पांचाळ गोंदिया एैवजी यवतमाळ जिपचे सीईओ

श्रीकृष्णनाथ पांचाळ गोंदिया एैवजी यवतमाळ जिपचे सीईओ

0
3826

गोंदिया,दि.14ः-राज्यसरकारने  काही आयएएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या होत्या.त्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा श्रीकृष्ण पांचाळ यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया या रिक्त पदावर केली होती.मात्र पांचाळ यांना गोंदिया जिल्हा परिषदेत यायची इच्छा नसल्यामुळे त्यांच्या बदली आदेशात फेरबदल करण्यात आले असून ते आता गोंदिया एैवजी यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्या जागेवर करण्यात आले आहे.त्यामुळे नवीन सीईओ येईपर्यंत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खेवले हेच सध्या गोंदिया जिल्हापरिषदेचे सीईओ राहणार आहेत.