37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ उड्डाण पुलाला श्री छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्याची मागणी

उड्डाण पुलाला श्री छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्याची मागणी

0
506

blank

लाखनी,दि.19ः- येथील श्री छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा समिती लाखनी /मुरमाडी/सावरी ,ओबीसी सेवा संघ व इतर सामाजिक संघटनांनी विधासभा अध्यक्ष नाना पटोले,खासदार सुनील मेंढे यांना भेटून व आमदार परिणय फुके यांचे स्वीय सचिव दिवाकर मने यांच्याकडे निवेदन सादर करीत लाखनी येथे बांधकाम सुरु असलेल्या उड्डाण पुलाला श्री छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.
लाखनी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक (बाजार चौक) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आहे.पण येथे शिवाजी महाराजांच्या नावाचे फलक नसल्याने अनेक लोकांना याची जाणीव नाही.लोकांना या चौकाची माहिती व्हावी व त्या चौकाची ओळख व्हावी म्हणून या चौकात भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारक व्हावे.उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल हे नाव मिळावे.या चौकाला सुशोभित करावे व चौकाला ऐतिहासिक महत्व प्राप्त व्हावे याकरिता लोक प्रतिनिधींना निवेदन देण्यात आले.यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संजयराव वनवे,सचिव नगरसेवक कोमलदादा गभने,उपाध्यक्ष स्वप्नील गायधनी,मार्गदर्शक बाबुराव निखाडेर ,प्रा.उमेश सिंगनजुडे,डॉ.अमित गायधनी,आनंदराव उरकुडे,गोपाल नाकाडे,प्रशांत वाघाये व इतर मान्यवर उपस्थित होते. खासदार आणि आमदार यांनी मागणी मान्य करून सहकार्य करायचे आश्वासन दिले.

blank