
अर्जुनी-मोर,दि.21ः-तालुक्यातील ताडगाव येथील सुधीर रूपचंद नाकाडे (33 वर्ष) या तरुणाचा मृतदेह सानगडी अर्जुनी-मोर रोड जवळील विहीरगाव सिलेझरीच्या जंगल कंपार्टमेंट नंबर 204परिसरातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आज मंगळवारला सकाळी 10 वाजेच्या सुमारास आढळून आला.माहिती होताच अर्जुनी-मोर पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अर्जुनी-मोर ग्रामीण रुग्णालयात पाठविले.पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच आत्महत्या की हत्या हे सांगता येईल असे ठाणेदार महादेव तोंडले यांनी सांगितले.





