35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता बिबट्याने केल्या ७ शेळ्या फस्त

बिबट्याने केल्या ७ शेळ्या फस्त

0
430

blank

अर्जुनी मोरगाव,दि.24ः-तालुक्यातील महालगाव येथील पशुपालक महावीर भोयर यांच्या घराशेजारच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्लाबोल करीत ठार केले. ही घटना (दि.२२) रात्री दरम्यानची आहे. या घटनेत पशुपालकाचे जवळपास ५० ते ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुका जंगल शिवाराने वेढलेला आहे. यामुळे नेहमीच तालुक्यात कुठेन-कुठे वन्यजीवांचा संचार पहावयास मिळतो.ऐवढेच नव्हेतर वाघ, बिबट्यामुळे अनेक पाढीव प्राण्यांचाही जीव जातो. महालगाव येथील महावीर भोयर या पशुपालकाच्या घराच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे ७ शेळ्या बांधल्या होत्या 22 जुर्लेच्या रात्रीदरम्यान बिबट्याने गावात येऊन गोठ्या बांधलेल्या शेळ्यांना फस्त केले. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे अधिकारी
राऊत, चांदेवार, यश कुथे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वाघाये, ड़ॉ.राऊत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पशुपालकाला नुकसानीची भरपायी द्यावी, अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.

blank