
गोंदिया,दि.26ः-देशामध्ये एकीकडे चीनबाबत नागरिकांत मोठा असतोंष उफाळून येत आहे.चीनने भारताच्या सीमेतघुसखोरी करुन भारताला डिवचन्याचे काम केलेले असतानाच गोंदिया जिल्ह्यात अनेक फुटपाथवरील दुकानदार व्यवसायकींना चायनीज फुड सेंटर नावाने दुकान थाटले आहे.एकीकडे चीनला धडा शिकवण्याच्या तयारीत देश असताना दुकानावर चायनीज उल्लेख कशाला हवा असा प्रश्न उपस्थित करीत शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी दुकानदारांनी आपल्या दुकानावरील चायनीज फुड सेंटरची पाटी त्वरीत बदलावी अन्यथा शिवसेना स्टाईलने त्या पाटीची तोडफोड करुन पाटी बदलण्याचा इशारा दिला आहे.





