41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home गुन्हेवार्ता ब्रम्हपुरी पोलिसांनी केला दारूसह १२ लाख ३0 हजारांचा मुद्देमाल जप्त

ब्रम्हपुरी पोलिसांनी केला दारूसह १२ लाख ३0 हजारांचा मुद्देमाल जप्त

0
192

blank

ब्रम्हपुरी,दि.29ः- दारूची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या एका चारचाकी वाहणाचा पाठलाग करून तब्बल २ लाखांच्या दारूसाठय़ासह १२ लाख ३0 हजार ८00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात ब्रम्हपुरी पोलिसांना यश आले.
नाकाबंदीदरम्यान भंडारा जिल्ह्यातील पौनीकडून येणार्‍या चारचाकी वाहनाला ब्रम्हपुरी पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कार न थांबल्याने पाठलाग करून ती कार थांबविण्यात आली. कारची झडती घेतली असता, कारमध्ये देशी दारूचा दोन लाख रुपयांचा साठा, मोबाईल, एक कार किमत ४ लाख, दुसरी कार ४ लाख ५0 हजार व देशी दारू किमत २८ हजार ८00 रु., दुचाकी किमत ४५ हजार रु. व देशी दारू किमत ६४ हजार ४00 रु., दुचाकी व दारूसाठा ६९ हजार ६00 असा सर्व गुन्ह्यातील १२ लाख ८0 हजार ८00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी आदित्य वैरागडे (१९ वर्षे) , अवतारसिंग दुधानी (३१ वर्ष), बंडू शेंडे (३५वर्षे), धीरज दिघोरे (३३ वर्षे), रीतादेवी मिर्श (४९ वर्षे), सुषमा विखार (३0 वर्षे) रजनी रामटेके (४0 वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नवे आहेत.
पोलिसांनी अशी धडाकेबाज कारवाई राबवित असल्याने दारू तस्करी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
ही कारवाई डी.बी. पथकातील पो.हवा. खोब्रागडे , नापोशी. हेमके , नापोशी रॉय , शुभांगिनी, प्रीती, शिवणकर, कटाइत व भगत आदींनी केली.