
गोंदिया,दि.29ः जिल्ह्यात आज नवे सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.चार रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहे.जिल्ह्यात कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या 29 झाली आहे.एकूण बाधित रुग्ण 266 झाली आहे.228 बाधित रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.जिल्ह्यात आज 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे त्यामध्ये देवरी येथे तीन आणि गोंदिया तालुक्यातील कुडवा,मोरवाही आणि किडांगीपार येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.यामध्ये गोंदिया तालुक्यातील एका आशा सेविकेचाही समावेश आहे.
रॅपिड अँटिजेन टेस्टमधून जिल्ह्यात आतापर्यंत आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. प्रयोगशाळा चाचणी,अँटिजेन टेस्ट आणि बाहेर जिल्हा व राज्यात आढळून आलेल्या जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 266 झाली आहे.
गोंदियाच्या विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 8770 नमुने पाठविण्यात आले.त्यापैकी 8202 नमुने निगेटिव्ह तर 254 नमुने पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.208 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा असून 106 नमुन्यांच्या अहवालाबाबत अनिश्चितता आहे.जिल्ह्यातील जे चार कोरोना बाधित जिल्ह्याबाहेर आढळले आहे त्यात नागपूर येथे तीन आणि एक रुग्ण बंगलोर येथे बाधित आढळला आहे.जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 266 झाली आहे.
विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात 207 आणि गृह विलगिकरणात 1083 असे एकूण 1290 व्यक्ती विलगिकरणात आहे.
कोरोना संशयित रुग्णांचा शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.यामध्ये आजपर्यंत जिल्ह्यातील 1462 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.यामध्ये 1454 अहवाल निगेटिव्ह आले.आठ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.कोरोनाच्या अनुषंगाने 166 चमू आणि 58 सुपरवायझरची 35 कॅटेंटमेंट झोनसाठी नियुक्ती केली आहे.कंटेंटमेंट झोनमधील मधुमेह, उच्च रक्तदाब,आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या घशातील स्त्राव घेण्यात येत आहे.
जिल्ह्यात आता 35 क्रियाशील कॅटेंटमेंट झोन असून यामध्ये गोंदिया तालुक्यात मुंडीपार, फत्तेपुर, डोंगरगाव, सेजगाव, पारडीबांध, गोंदिया येथील कुंभारेनगर व सिव्हिल लाईन.रेल्वे लाईन, कुडवा.सालेकसा तालुक्यातील पाथरी, पाउलदौना,शारदानगर,रामाटोला, देवरी तालुकयातील देवरी येथील वार्ड क्रमांक 8,वार्ड क्रमांक 9 आणि वार्ड क्रमांक 16 ,आखरीटोला व गरवारटोली,सडक/अर्जुनी तालुक्यातील राका, सौंदड, खोडशिवनी व पाटेकुरा.गोरेगाव तालुक्यातील भडंगा,डवा व घोटी आणि तिरोडा तालुक्यातील तिरोडा येथील सुभाष वार्ड, विर वामनराव चौक,भूतनाथ वार्ड, न्यू सुभाष वार्ड,किल्ला वार्ड, नेहरू वार्ड,गराडा,बेरडीपार,बेलाटी/खुर्द आणि अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी आदी गाव आणि वार्डचा या कंटेनमेंट झोनमध्ये समावेश आहे.





