37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ निराधार योजनेच्या लाभासाठी उत्पन्नाची मर्यादा 50 हजार करावी-आर.के.जांभुळकर

निराधार योजनेच्या लाभासाठी उत्पन्नाची मर्यादा 50 हजार करावी-आर.के.जांभुळकर

0
106

अर्जुनी मोर.दि.31ः- श्रावणबाळ,संजय गांधी या निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र रेषेखाली दाखला किंवा 21 हजार वार्षिंक उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. मात्र 21 हजार वार्षिंक उत्पन्नाचा दाखला मिळणे दुरापास्त झाले असल्याने निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी वार्षिंक उत्पन्नाची मर्यादा किमान 50 हजार करण्यात यावी अशी मागणी अर्जुनी मोर. राष्टवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष आर.के.जांभुळकर यांनी केली आहे.किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर भूमीहीन शेतक-यांसाठी स्वतंत्र योजना सुरु करण्यात यावी, त्याचा वार्षिंक दर दहा हजार रुपये देण्यात यावा,अर्जुनी मोर. येथे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांचे जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात यावे,श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी 21 हजार रुपयांची उत्पन्नाची अट शिथील करुन 50 हजार वार्षिंक उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात यावी.शेतक-यांना 16 तास विज देण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. अर्जुनी मोर. नगरपंचायत हद्दीत मग्रारोहयोची कामे सुरु करुन शहरातील गरजु लाभार्थ्याना शिलाई मशीन, सारख्या विवीध योजनेचा लाभ देण्यात यावा,अर्जुनी मोर. शहरात चौकाचौकात हाॅयमास्ट लाईट लावण्यात यावे.शहरात वाढत असलेली सुशिक्षित बेरोजगारांची संख्या लक्षात घेता सामाजिक न्याय विभागाचे मार्फत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योग्य पावले उचलण्यात यावी अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या सर्व मागण्यांचे निवेदन राष्टवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि या विभागाचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे,सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्षकडे या मागण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती आर.के.जांभुळकर यांनी दिली.
सभेला प्रमोद डोंगरे, अजय शहारे, शामराव बांबोळे, यशवंत शहारे, आस्तीक बन्सोड, त्रिशरण शहारे, शैलेंद्र बोरकर, रोशन सांगोळे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

blank