32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ शासनाच्या योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा – भंडारी

शासनाच्या योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा – भंडारी

0
115

blank

 कोरची,दि ३, महसूल विभाग हा शासनाचा कणा असून शासनाच्या प्रत्येक योजनांचा लाभ तालुक्यातील जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहन तहसीलदार सी. आर. भंडारी यांनी केले.
तहसील कार्यालयात  १ ऑगस्ट रोजी महसूल दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमास पोलिस उपनिरीक्षक श्रीमंगल, नायब तहसीलदार बी. एन. नारनवरे, आर. के. बोके, एस. एच. गजभिये, सहाकरी संस्थेचे सहायक निबंधक शिरगावे, न.पं.चे प्रशासकीय अधिकारी बी. व्ही. हाके उपस्थित होते.
महसूल दिनाचे औचित्य साधून नागरिकांना शीधापत्रिका, उत्पन्नाचे दाखले, संगणीकृत ७/१२, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र यांच्या इतर दाखले मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच सन २0१९-२0 या वर्षात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांचा प्रशिस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक नायबत तहसीलदार बी.एन. नारनवरे, संचालन दीपक खोब्रागडे, तर आभार आर.के. बों यांनी मानले. कार्यक्रमास तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, कोरची येथील नागरीक उपस्थित होते.
यावेळी कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

blank